पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2020 : या पाच गोलंदाजांवर असतील बंगळूरुच्या नजरा

मागील काही हंगामात बंगळुरुच्या संघाने निराशजनक कामगिरी केली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्वाची एक छाप उमटवली आहे. मात्र आयपीएलच्या मैदानात त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. गेल्या काही हंगामात विराटच्या नेतृत्वाखाली बंगळुरु रॉयल्स संघाने निराशजनक कामगिरी नोंदवली. यंदाच्या हंगामात ही उणीव भरीव काढण्याच्या उद्देशाने बंगळुरुचा संघ मैदानात उतरेल. आगामी आयपीएलसाठी खेळांडूचा लिलाव यंदा कोलकातामध्ये नियोजित आहे. १९ डिसेंबरला हा लिलाव होणार आहे. सध्याच्या घडीला खेळाडूंची 'ट्रेडिंग विंडो' सुरु झाली असून १४ नोव्हेंबरपर्यंत फ्रेंचायजी खेळाडूंची अदाल-बदली किंवा  संघातील खेळाडूची विक्री-खरेदी करु शकतात. 

रजिथाच्या नावे लाजिरवाणा विक्रम, टी-२० त सर्वात महागडा गोलंदाज

आपण या लेखातून बंगळुरुच्या दृष्टिने लिलावात काय फायदेशीर असू शकेल, यावर नजर टाकणार आहोत. बंगळुरुचा संघात जलद गोलंदाजांनी सर्वाधिक निराश केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आगामी आयपीएल स्पर्धेत संघ बांधणी करताना बंगळुरुचा संघ जलदगती गोलंदाजांना आपल्या ताफ्यात सामील करुन घण्यास उत्सुक असेल. विश्वचषकात दमदार कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडचा मॅट हॅन्री बंगळुरुसाठी एक उत्तम पर्याय ठरु शकेल. याशिवाय यापूर्वी बंगळुरु संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या क्रिस वोक्सवर देखील त्यांच्या नजरा असतील. ज्यावेळी क्रिस वोक्स बंगळुरुच्या संघात होता त्यावेळी तो फारशी चमक दाखवू शकला नव्हता. मात्र सध्या तो चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे बंगळुरुचा संघ त्याच्याबाबत काय विचार करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

तमिमसाठी गुड न्यूज! पण, बांगलादेशचा संघ गोत्यात

वेस्ट इंडिजचा शेल्डन कोट्रेलही मैदानात दमदार कामगिरी करताना दिसत आहे. चेंडूवरील नियंत्रण आणि गतीमधील परिवर्तन करण्याची त्याच्यात चांगली क्षमता आहे. हा देखील बंगळुरुचं दुखणं कमी करण्यावरचा उत्तम उपाय ठरु शकेल. पेट कमिन्स आणि मिचल स्टार्क हे देखील बंगळुरुसाठी फायदेशीर ठरणारे गोंलदाज लिलावात आहेत. मिचेल स्टार्कने आयपीएलच्या रिंगणातून बाहेर आहे. मात्र आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर तो आयपीएलमध्ये खेळण्याचा विचार करत आहे. त्यामुळे बंगळुरु त्याच्यावर दाव लावणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. 

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, प्रत्येक फ्रेंचायजीला लिलावासाठी ८५ कोटींची मर्यादा दिली आहे. यापूर्वी २०१९ च्या लिलावासाठी ही रक्कम ८३ कोटी इतकी मर्यादीत होती. ३ कोटींच्या वाढीसह फ्रेंचायजीकडे मागील हंगामातील उर्वरित रक्कम देखील असेल.