पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: धोनीचे 'चिल्लर पार्टी'सोबत सेलिब्रेशन

महेंद्रसिंह धोनी आणि त्याची मुलगी झिवा

यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची लाडकी लेक झिवा यांच्यातील प्रेमानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयानंतरही बाप-लेकीच्या प्रेमाची एक आगळी-वेगळी अनुभूती पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्जनं  दिमाखात फायनलमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर झिवाने धोनीला अनोखे गिफ्ट दिले. एखाद्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे धोनीला अनेकदा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. मात्र कालच्या सामन्यानंतर त्याला लेकीकडून मिळालेलं गिफ्ट खास असच होतं.  

विश्वचषकापूर्वी बार्मी आर्मीचा वॉर्नरला बाऊन्सर!

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ आठव्यांदा फायनलमध्ये दाखल झाला आहे. दिल्लीला शह दिल्यानंतर पुन्हा एकदा धोनी आपल्या लाडक्या लेकीसोबत विजयाच सेलिब्रेशन करताना दिसला. यावेळी झिवाच्या हातात धोनीच्या एका चाहत्याने दिलेली धोनीची प्रतिमा असणारे एक गिफ्ट होते. त्याकडे ती एकटक बघत होती. त्यानंतर स्वीट झिवाने फायनलमध्ये प्रवेश केलेल्या आपल्या बाबांचा (धोनीला) क्विट पापा घेत धोनीचा आनंद द्विगुणित केला. यावेळी धोनीच्या चेहऱ्यावर फुललेल हसू त्याचा आनंद सांगून जाणारे होते. हा व्हिडिओ एका चाहत्याने ट्विटरवरुन शेअर केला असून तो चांगलाच लोकप्रिय होत आहे.  

दिल्ली विरुद्धच्या सामन्यानंतर धोनी झिवासह सुरेश रैनाची मुलगी ग्रेसिया आणि आपल्या संघ सहकाऱ्यांच्या इतर चिमुकल्यांसह मैदानात खेळताना पाहायला मिळाले. ड्रेसिंगरुममध्ये त्याने इमरान ताहिरच्या चिमुकलीसहही वेळ घालवला. धोनीचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IPL 2019 ziva kisses ms dhoni after csk beat delhi capitals to enter 8th ipl final watch video of ipl