पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019 MI v CSK : आकड्यांचा कल मुंबईच्या बाजूने

रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. हैदराबादच्या मैदानात रंगणाऱ्या सामना जिंकून विजयी चौकार कोण खेचणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आयपीएल स्पर्धेत या दोन संघाची मक्तेदारी राहिली आहे.

दोन्ही संघानी एकमेकांसोबत खेळलेल्या २९ सामन्यात मुंबई इंडियन्सने तब्बल १७ तर चेन्नई सुपर किंग्जने १२ सामने जिंकले आहेत. आकड्यांच्या गणितात मुंबई चेन्नईपेक्षा भारी आहे. यंदाच्या हंगामातही मुंबईचा दबदबा राहिला आहे. दोन्ही संघात झालेल्या तिन्ही सामन्यात मुंबईने बाजी मारली.  

IPL 2019 : या विक्रमासह ऑरेंज कॅप वॉर्नरकडेच राहणार!

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार आहेत. त्यामुळे हे मैदान कुणासाठी लकी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सामन्यापूर्वी बीसीसीआयचे पिच क्यूरेटर वाय. एल. चंद्रशेखर यांनी खेळपट्टीचा अंदाज सांगितला आहे. खेळपट्टी समतोल असून फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही बाजूचा विचार करुन खेळपट्टी तयार केल्याचे ते म्हणाले. 

खेळपट्टीने आतापर्यंत गोलंदाजांना साथ दिल्याचे पाहायला मिळाले आहे. या मैदानात जलदगती गोलंदाजांनी ५२ तर फिरकीपटूंनी २७ बळी टिपले आहेत. सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या खलील अहमदने घरच्या मैदानावर खेळलेल्या चार सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत. 

वुमन्स टी 20 चॅलेंज फायनल : हरमनप्रीतच्या संघाची 'बल्लेबल्ले'

२०१७ च्या आयपीएल हंगामातील अंतिम सामना हैदराबादच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. यावेळी राइजिंग पुणे सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स अशी लढत पाहायला मिळाली होती. हा सामना मुंबईने अवघ्या एका धावेनं जिंकला होता. आकडे मुंबई इंडियन्सच्या बाजूने असले तरी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना आकडे फिरवण्याची ताकद निश्चितच आहे.