पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019, KXIP vs KKR: ‘करो वा मरो’ ची लढाई

आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि  किंग्स इलेव्हन पंजाब या दोन्ही संघात आज (शुक्रवारी) ‘करो वा मरो’ ची लढाई पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाला आहेत. ‘प्ले ऑफ’मधील आस कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघाच्या दृष्टिने आजचा सामना महत्त्वपूर्ण आहे. 

भारत कसोटीत शेर..अन् टी-२० क्रिकेटमध्ये फेल!

स्पर्धेच्या पहिल्या सत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात हे संघ कोलमडले. सुरुवातीच्या पाच सामन्यात केवळ एक पराभव पत्करलेल्या कोलकाता नाईट रायडर्सवर सलग सहा पराभव पत्करण्याची वेळ आली. मुंबई इंडियन्सला पराभूत करत त्यांनी पुन्हा आपल्यातील क्षमता सिद्ध केली असली तरी स्पर्धेतील प्रवास कायम ठेवण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. कोलकाताकडून अष्टपैलू आंद्रे रसेल चांगली कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांत ४८६ धावा केल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. 

VIDEO: रोहितच्या बोलंदाजीनं टीकाकारांची बोलती बंद

दुसरीकडे पंजाबची अवस्थाही बिकट आहे. या सामन्यापूर्वी त्यांनी लागोपाठ तीन सामने गमावले आहेत. त्यांच्या ताफ्यातील लोकेश राहुल दमदार कामगिरी करत आहेत. त्याने १२ सामन्यांत ५२० धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत डेव्हिड वॉर्नरनंतर तो दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्यासह मयंक अग्रवाल, निकोलस पूरण व डेव्हिड मिलर यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. पंजाबच्या गोलंदाजीची धूरा मोहम्मद शमी, कर्णधार आर. अश्‍विन यांच्यावर असेल.