पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019 : कोलकातानं पंजाबला केलं 'प्ले ऑफ'मधून बाद

कोलकाताच्या विजयासह किंग्ज इलेव्हन पंजाब प्लेऑफमधून बाहेर

मोहालीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला ७ गडी राखून पराभूत केले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने निर्धारित २० षटकात ६ बाद १८३ धावा केल्या होत्या. हे लक्ष्य कोलकाता नाईट रायडर्सने दोन षटके आणि ७ गडी राखून पार केले.   

किंग्ज इलेव्हन पंजाबने ठेवलेल्या १८४ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर ख्रिस लिनने कोलकाता नाईट रायडर्सला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने शुभमन गिलच्या साथीने पॉवर प्लेमध्ये ६१ धावांची भागीदारी केली. त्याने २२ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकार मारत ४६ धावांची दमदार खेळी केली. 

लिन बाद झाल्यानंतर उथप्पाने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली त्याने २ चौकार १ षटकार खेचत १४ चेंडूत २२ धावा कुटल्या. फटकेबाजी करण्याच्या नादात त्याने अश्विनला विकेट दिली. त्यानंतर सलामवीर शुभमन गिलने धावांचा वेग वाढवला. त्याने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. गिलच्या जोडीला आलेल्या आंद्रे रसेलने २ षटकार २ चौकारासह १४ चेंडूत २४ धावा करुन बाद झाला. गिलने अखेरपर्यंत मैदान तग धरुन फलंदाजी करत केकेआरचा विजय निश्चित केला. त्याने ४९ चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी केली. त्याला कार्तिकने चांगली साथ दिली. या पराभवासह किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याचा मार्गही बंद झाला आहे.