पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फिरकीपटू ताहिरचा कहर, विक्रमासह पर्पल कॅपवर कब्जा

इम्रान ताहिर (फोटो सौजन्य ट्विटर)

हैदराबादच्या मैदानात सुरु असलेल्या अंतिम सामन्यात इमरान ताहिरच्या फिरकीने मुंबईला अडचणीत आणले आहे. बाराव्या षटकात कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ताहिरच्या हाती चेंडू सोपवला. ताहिरने सूर्यकुमारला क्लिन बोल्ड करत यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या कासिगो रबाडाची बरोबरी केली.

शतकाच्या हुलकावणीनंतरही स्मृतीच्या नावे विक्रमाची नोंद

त्यानंतर १५ व्या षटकात पोलार्डने षटकाराने ताहिरचे स्वागत केले. यातून सावरत त्याने निर्धाव चेंडू टाकत दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या चेंडूवर पोलार्डने एकेरी धाव घेत इशान किशनला स्ट्राइक दिले.  इशान किशन हा बऱ्यापैकी सेट झाला होता. मात्र ताहिरच्या फिरकीच्या अंदाज घेण्यात तो चुकला. ताहिरने स्वत:च्या गोलंदाजीवर सुरेख झेल पकडत यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याने पर्पल कॅप आपल्या डोक्यावर चढवली. 

IPL 2019 : या विक्रमासह ऑरेंज कॅप वॉर्नरकडेच राहणार!

यासोबतच आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रमही आता त्याच्या नावे झाला आहे. यापूर्वी २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या फिरकीपटू सनिल नरेनने २४ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. या यादीत हरभजन तिसऱ्या स्थानावर आहे.  त्याने २०१३ मध्ये २२ विकेट्स मिळवल्या होत्या. तर भारताच्या युवा गोलंदाज युजवेंद्र चहलने २०१५ मध्ये २३ विकेट्स घेतल्या होत्या.