हैदराबादच्या मैदानावर सुरु असलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या डावातील अखेरच्या षटकात बर्थडे बॉय आणि स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डचे एक वेगळे रुप पाहायला मिळाले. चेन्नईकडून अखेरचे षटक घेऊन आलेल्या ड्वेन ब्रावोने स्ट्राइकवर असलेल्या कायरन पोलार्डला पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले. त्यानंतर ब्रावोने टाकलेला तिसरा चेंडू हा ऑफ स्टंम्पच्या खूपच बाहेरुन गेला. मात्र पंचांनी तो चेंडू योग्य ठरवला.
IPL 2019 : या विक्रमासह ऑरेंज कॅप वॉर्नरकडेच राहणार!
What's up with Pollard? https://t.co/wTnyJ7aOIq via @ipl
— bishwa mohan mishra (@mohanbishwa) May 12, 2019
पंचाच्या या निर्णयावर पोलार्डला खूपच राग आला. त्याने आपली बॅट हवेत उंचावून राग व्यक्त केला. एवढ्यावरच तो थांबला नाही. तर ब्रावोने पुढचा चेंडू टाकायला पळत येत असताना पोलार्ड चक्क ऑफ स्टंम्पसोडून वाइड रेषेच्याही बाहेर जाऊन उभा राहिला. पोलार्डचे हे रुप पाहून पंचांनी ब्रावोला थांबवले. त्यानंतर ते पोलार्डकडे गेले.
फिरकीपटू ताहिरचा कहर, विक्रमासह पर्पल कॅपवर कब्जा
पोलार्डने पंचाची चूक दाखवण्यासाठी ही सर्व खटाटोप केली. यावर पंचांनी त्याला समजावत सरळ खेळण्याच्या सूचना दिल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या दोन चेंडूवर दोन चौकार खेचत पोलार्डने ४१ धावा करुत नाबाद परतला.