पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019 : यंदा इतिहास रचण्याचा श्रेयसचा इरादा

दिल्ली कॅपिटल्स कर्णधार श्रेयस अय्यर

इतिहास घडवण्याच्या इराद्यानेच आम्ही विशाखापट्टणमच्या मैदानात उतरणार असल्याचे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने म्हटले आहे. आज (बुधवार) दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन संघ एलिमेटर राउंडमध्ये एकमेकांसमोर भिडणार आहेत. 

या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, सनरायजर्स हैदराबाद विरुद्धचा सामना रोमहर्षक होईल. आम्ही यंदाच्या हंगामात 9 सामने जिंकले असून जे पाच सामन्यात आम्हाला पराभव पत्कारावा लागला त्यातही आम्ही प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर दिली. साखळी सामन्याबद्दल आता फार विचार करणे चुकीचे ठरेल. आता आम्ही  एलिमिनेटर राउंडवर लक्ष्यकेंद्रीत केले आहे. सनरायजर्स हैदराबाद संघ चांगला असून त्यांच्या विरुद्ध विजय मिळवणे सोपे नाही, असेही श्रेयस म्हणाला. 

DC vs SRH, Eliminator : पृथ्वी 'क्लास शो' दाखवणार?

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात  साखळी फेरीत झालेल्या दोन सामन्यात दोन्ही संघानी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. विशेष म्हणजे हैदराबादने दिल्लीला घरच्या मैदानावर तर दिल्लीने हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. आयपीएलमधील दोन्ही संघाचा विचार केल्यास या दोन संघात आतापर्यंत 14 सामने झाले आहेत. यात 9 वेळा हैदराबादने बाजी मारली आहे. तर दिल्लीला केवळ 5 सामन्यात विजय मिळाला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ipl 2019 eleminator match dc vs srh here is what shreyas iyer said before match delhi capitals vs sunrisers hyderabad