पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतनं दिल्लीचं तख्त राखलं, नवाबांची घरवापसी!

दिल्ली कॅपिटल्सची आगेकुच

आयपीएलच्या मैदानातील एलिमिनेटर सामन्यात सनरायजर्स हैदराबादला नमवत दिल्लीने दुसऱ्या क्लॉलिफायर सामन्यासाठी प्रवेश निश्चित केला. या सामन्यातील पराभवामुळे सनरायजर्स हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने निर्धारित २० षटकात ८ बाद १६२ धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने २ गडी राखून सामना खिशात घातला. अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी दिल्ली आता चेन्नईसोबत भिडणार आहे. 

सनरायजर्स हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना धवन आणि पृथ्वीने अर्धशतकीय भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. धवन संघाच्या धावसंख्येत १७ धावांची भर घालून चालता झाला. त्यानंतर पृथ्वी शॉने आपला क्लास दाखवत आयपीएल स्पर्धेतील दुसरे अर्धशतक झळकवले. त्याने ३८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५६ धावांचे योगदान दिले. कर्णधार श्रेयस अय्यर अवघ्या ८ धावा करुन परतला. त्यानंतर ऋषभ पंतने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने २१ चेंडूत२ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ४९ धावांची खेळी करत सामना दिल्लीच्या बाजूनं झुकवला.  मात्र तो बाद झाल्यानंतर सामन्यात पुन्हा रंगत निर्माण झाली. दोन चेंडूत दोन धावांची गरज असताना पॉलने चौकार खेचून सामना दिल्लीच्या नावे केला.         

IPL 2019 : यंदा इतिहास रचण्याचा श्रेयसचा इरादा
 

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.  प्रथम फंलदाजीसाठी मैदानात उतरलेल्या  सनरायझर्स हैदराबादला सलामीवीर मार्टिन गप्टीलने आक्रमक अंदाजात सुरुवात करुन दिली. मात्र, दुसऱ्या बाजूला वृद्धीमान साहला पहिल्या चेंडूवर रिव्ह्वूने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवता आला नाही. पंचांनी बाद दिल्यानंतर त्याला पुन्हा एक संधी मिळाली. पण त्याला इशांत शर्माने जास्त काळ टिकू दिले नाही. तो ८ धावांवर तंबूत परतला.  दुसऱ्या बाजूने गप्टीलने आक्रमक फटकेबाजी करत पॉवर प्लेमध्ये संघाला ५४ धावांचा टप्पा पार करुन दिला. मात्र, ३६ धावांवर गप्टिला अमित शर्माने माघारी धाडले. तो  बाद झाल्यानंतर हैदराबादची धावगती मंदावली. मनिष पांडेने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

Women’s T20 Challenge: दिप्तीनं वेलॉसिटीला २ धावांसाठी रडवलं

त्याने संघाच्या धावसंख्येत ३० भर घातली. त्याच्या पाठोपाठ कर्णधार केन विल्यम्सनही २८ धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकात विजय शंकरने केलेल्या फटकेबाजीमुले हैदराबादने १५० धावांचा टप्पा ओलंडता आला.  विजय शंकरने अवघ्या १० चेंडूत २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २५ धावांची खेळी केली. निर्धारित २० षटकामध्ये हैदराबादने ८ बाद १६२ धावा केल्या. दिल्लीकडून कीमो पॉलने अखेरच्या षटकात ३ विकेट घेतल्या तर ईशांत शर्माने २ तर अमित मिश्राने १ गडी बाद केला.