पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019: पंतने पॉटिंगचा विश्वास जिंकला!

पॉटिंग आणि ऋषभ पंत

यंदाच्या आयपीएल हंगामात नाव बदलून मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने (पूर्वीचे नाव दिल्ली डेअरडेव्हिल्स) ने कमालीची कामगिरी करुन दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगच्या मार्गदर्शनाखील नव्या दमाच्या ताफ्याने गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले आहे. पॉटिंगने संघाच्या यशाचे श्रेय आपल्या युवा ब्रिगेडला दिले आहे.  

पॉटिंग म्हणाला की, ऋषभ पंत सारख्या युवा खेळाडूंवर दाखवलेला विश्वास संघासाठी लाभदायी ठरला. सुरुवातीच्या काळात खराब कामगिरीनंतर काही खेळाडूंना बाहेर का बसवले नाही, असे प्रश्न  आम्हाला विचारले जात होते. पण मला वाटते की, संघातील प्रतिभावंत खेळाडूंवर विश्वास ठेवायला हवा. संघात सामन्याला कलाटणी देणारे खेळाडू आहेत. झटपट सामन्यात एका चांगल्या खेळीची गरज असते. 

तो पुढे म्हणाला ऋषभ पंतने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स सारख्या संघाविरुद्ध ७८ धावांची बहुमुल्य खेळी केली होती. त्यानंतर तो राजस्थान रॉयल्सविरुद्धही चमकला. त्याच्यासारख्या फलंदाजाकने हंगामात चार-पाच सामने जिंकून द्यावेत ही अपेक्षा असते. आतापर्यंत त्याने दोन सामने जिंकून दिले आहेत. तो पुढेही अशीच कामगिरी करेल. संघ योग्यवेळी चांगला खेळ करत आहे, ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत १२ सामने खेळले असून १६ गुण प्राप्त करुन संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे. या संघाने चेन्नई सुपर किंग्जनंतर प्ले ऑफचे तिकीट पक्के केले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ipl 2019 Delhi Capitals Coach Ricky Ponting Says Trust On Rishabh Pant Pays off well for the team