पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL DC vs RR : पंतचा धोनी स्टाइल फिनिशिंग टच, राजस्थानचा खेळ खल्लास!

ऋषभ पंत

 
दिल्लीच्या फिरोजशहा कोटलाच्या मैदानात ऋषभ पंतने षटकार खेचून दिल्ली कॅपिटल्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. दिल्लीने ५ गडी राखून सामना जिंकत राजस्थान रॉयल्सला स्पर्धेतून बाहरचा रस्ता दाखवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर रियान परागच्या एकाकी झुंजीमुळे संघाला शंभरी गाठता आली. रियानने ४९ चेंडूत ४ चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या.

त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित २० षटकात ९ बाद ११५ धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून ईशांत शर्मा आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी तीन तर ट्रेन्ट बोल्टने दोन गडी बाद केले. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवातही खराब झाली. पृथ्वी शॉअ अवघ्या ८ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर धवन (१६) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (१५) धावा करुन माघारी फिरले. एका बाजूने विकेट्स पडत असताना ऋषभ पंत मैदानात तग धरुन उभा राहिला.

त्याने ३८ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ३८ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी केली. सतराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार खेचत त्याने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयामुळे दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला असून या पराभवामुळे राजस्थानच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.