पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मिश्राची हॅट्ट्रिक हुकली, झेल सोडल्याने ट्रेंट बोल्ट झाला ट्रोल

अमित मिश्रा

आयपीएलच्या हंगामात नव्या नावानं उतरलेल्या दिल्लीने घरच्या मैदानावर खेळलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या स्पर्धेतून बाद केले. या सामन्यात दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्राची हॅट्ट्रिकची संधी हुकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला ईशांत शर्माने सुरुवातीलाच धक्के दिले. त्यानंतर अमित मिश्राच्या फिरकीतील जादू पाहायला मिळाली.

राजस्थानच्या डावातील १२ व्या षटकात मिश्रा आयपीएलमधील वैयक्तिक चौथ्या हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर होता. या षटकात त्याने दुसऱ्या चेंडूवर  श्रेयस गोपाळला (१२) तंबूचा रस्ता दाखवला. पंतने त्याला यष्टिचित केले. त्यानंतरच्या चेंडूवर चेंडूवर मिश्राने स्टुअर्ट बिन्नीला खातेही न उघडू देता पंतकरवी झेलबाद केले. दोन चेंडूत दोघांना बाद केल्यानंतर मिश्रा आयपीएलमधील चौथी हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी सज्ज झाला. चौथ्या चेंडूवर कृष्णप्पा गॉथमने चेंडू हवेत मारला. अन् मिश्राला हॅट्ट्रिक मिळाली असे वाटत असताना शेर्फन रुदरफोर्ड आणि ट्रेंट बोल्ट यांच्यातील गोंधळाने झेल सुटला. या झेलसोबतच ट्रेंट बोमुळे अमित मिश्राने हॅटट्रिकची संधी गमावली. 

IPL DC vs RR : पंतचा धोनी स्टाइल फिनिशिंग टच, राजस्थानचा खेळ खल्लास!

दिल्लीच्या मैदानात मिश्राच्या गोलंदाजीवर झेल सोडल्याने ट्रेंटला नेटकरी ट्रोल करत आहेत. मिश्राच्या नावे आज हॅट्ट्रिकची नोंद व्हायला हवी होती. त्याने अतिशय उत्तम गोलंदाजी केली. ट्रेंटमुळे त्याची संधी हुकली, अशा प्रतिक्रिया ट्विटरवर उमटताना दिसत आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IPL 2019 DC vs RR Trent Boult drops a catch to deny Amit Mishra fourth IPL hat trick Twitter erupts