पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019, DC vs RR : राजस्थान 'जर-तर'च्या चक्रव्यूहात!

अजिंक्य रहाणे

आयपीएलच्या मैदानात आज (शनिवार) दुपारच्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होत आहे. हा सामना जिंकून प्लेऑफमधील आपली आशा जिवंत ठेवण्याचे अजिंक्य रहाणेच्या राजस्थान रॉयल्ससमोर आव्हान असणार आहे. दिल्ली कॅपिटर्सने यापूर्वीच प्ले ऑफचे तिकिट मिळवले आहे. दिल्ली हा सामना जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेण्यासाठी दिल्ली प्रयत्नशील असेल. यंदाच्या आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात राजस्थानची कमान सांभाळल्यानंतर अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलियन स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळला होता. स्मिथ मायदेशी परतल्यानंतर आता पुन्हा राजस्थानचे नेतृत्व अजिंक्यकडे सोपवण्यात आले आहे.    

IPL 2019 : कोलकातानं पंजाबला केलं 'प्ले ऑफ'मधून बाद

अजिंक्यच्या राजस्थान रॉयल्सला केवळ दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना जिंकून चालणार नाही. तर हा सामना जिंकल्यानंतर त्यांना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी प्रार्थना करावी, लागेल. आज रात्रीच्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु घरच्या मैदानावर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामना खेळणार आहे. तर उद्या (रविवारी) रात्रीच्या सत्रात मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. गुणतालिकेत हैदराबाद आणि कोलकाता संघ हे दोन्ही संघ  सध्याच्या घडीला प्रत्येकी १२ गुणांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. राजस्थान ११ गुणांसह सहाव्यास्थानावर आहे. म्हणजे प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना आजचा सामना जिंकावा लागेलच शिवाय त्यानंतर हैदराबाद आणि कोलकाता यांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

भारत कसोटीत शेर..अन् टी-२० क्रिकेटमध्ये फेल!

या दोन्ही संघांनी आपला अखेरचा सामना गमावला तर हे दोन्ही संघ १२ गुणावरच राहतील. राजस्थानने दिल्ली जिंकली तर १३ गुणांसह ते प्ले ऑफसाठी पात्र ठरु शकतील.