पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL : धोनीच्या किंग्जविरुद्धच्या लढाईपूर्वी पांड्याचा ट्विटर स्ट्रोक

हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनी

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने ट्विटच्या माध्यमातून धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ चौथ्यांदा आयपीएल चषक उंचावण्याच्या इराद्याने रविवारी मैदानात उतरणार आहेत. 
शुक्रवारी विशाखापट्टणमच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात  दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेट्सने नमवत चेन्नईने अंतिम फेरी गाठली. चेन्नईचे फायनल तिकीट पक्के झाल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्विटच्या माध्यमातून धोनीच्या किंग्जविरुद्ध लढण्यास सज्ज असल्याचे ट्विट पांड्याने केलं.

हार्दिक पांड्याने एक फोटो शेअर करत रॉयल लढाईसाठी तयार आहे, असे ट्विट केले आहे. मुंबई इंडियन्सला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यामध्ये पांड्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याने यंदाच्या हंगामात 393 धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर फलंदाजीसोबत गोलंदाजीमध्येही त्याने सुरेख कामगिरी नोंदवली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात त्याचे नावे 14 विकेट्स आहेत.  

विश्वचषकापूर्वी बार्मी आर्मीचा वॉर्नरला बाऊन्सर!

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी हैदराबादच्या मैदानात आयपीएलच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे. दोन्ही संघांचा आयपीएलमधील इतिहास एकामेकांच्या तोडीस तोड देणारा आहे. यंदाची स्पर्धा जिंकून आयपीएलमध्ये सरस ठरण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील.