पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019: Video स्ट्रॅटेजिक टाइमनंतर पंचांची मेमरी झाली लॉस

 स्ट्रॅटेजिक टाइम आऊटनंतर चेंडूच हरवला

आयपीएलच्या मैदानातील वादग्रस्त निर्णयानंतर आता पंचाच्या विसरभोळेपणाची घटना चर्चेचा विषय ठरत आहे. फलंदाज खेळण्यासाठी स्ट्राइक घेऊन तयार झाला असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर चेंडू  शोधाशोध करण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात बुधवारी रंगलेल्या सामन्यावेळी हा सर्व प्रकार घडला. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावातील अडीच मिनिटांच्या स्ट्रॅटेजिक टाइम आऊटनंतर पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने अंकित राजपूतला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. यावेळी एबी डिव्हिलियर्स आणि स्टॉयनिस ही जोडी खेळ सुरु करण्यासाठी तयार होती. गोलंदाजीसाठी तयार झालेल्या अंकितने पंचाकडे चेंडू मागितला तेव्हा मैदानातील पंच अश्विनकडे पाहायला लागले.अश्विनने आपल्याकडे चेंडू नसल्याचे सांगितल्यावर मैदानाच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर ऑफफिल्ड पंचांनी चेंडूच्या बॉक्ससह मैदानात एन्ट्री केल्याचेही पाहायला मिळाले. 

ज्यावेळी ऍक्शन रिप्लेमध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आऊटपूर्वीच्या १४ व्या षटकात हरवलेला चेंडूचा शोध घेण्यात आला त्यावेळी शम्सुद्दीन या पंचांनी हा चेंडू आपल्या खिशात ठेवला होता, हे लक्षात आले. अॅक्शन रिप्लायचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मैदानात एकच हाशा पिकला. त्यानंतर सामना सुरु करण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुने एबी डिव्हिलियर्स (८२) आणि स्टॉयनीस (४६) धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ४ बाद २०२ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबला ७ बाद १८५ धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरुने हा सामना १७ धावांनी जिंकला.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IPL 2019 Bangalore vs Punjab 42nd Match lost ball halts play as umpire pockets it and forgets