जपानमधील टोकियोमध्ये नियोजित असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेवर कोरोनाचे सावट आहे. स्पर्धा नियोजित वेळेनुसार होणार की स्थगित करण्यात येणार यासंदर्भातील संभ्रम लवकरच दूर होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना चार आठवड्यात स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.
लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, केंद्राचे राज्यांना निर्देश
ऑलिम्पिक महासंघाने आपली भूमिका स्पष्ट करण्यापूर्वीच कॅनडाने सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. आयओसी, जगभरातील विविध देशातील खेळ संघटना, प्रसारक आणि आयोजकांसोबत चर्चा करुन यासंदर्भातील फैसला करेल. २४ जुलैपासून नियाजित स्पर्धेसंदर्भात निर्णय घेण्याबाबत होणाऱ्या विलंबाच्या संदर्भात आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांनी पत्राच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले.
लॉकडाऊननंतर शरद पवार यांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित व्हावी, असे कोणालाही वाटत नाही. पण खेळाडूंचा जीव धोक्यात घालून स्पर्धा खळवणे उचित ठरणार नाही. सध्याच्या घडीला खेळांडूना सरावासाठीही अनुकूल वातावरण नाही, त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होत आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. ऑलिम्पिकच्या स्थगितीबाबतही विचार सुरु असल्याचे ऑलिम्पिक महासंघाने मान्य केले आहे.