पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रो कबड्डीनंतर आता टेबल टेनिसमध्येही दिसणार 'पुणेरी पलटण'

पुणेरी पलटण संघ टेबल टेनिसमध्ये उतरण्यास सज्ज

पुणेरी पलटण संघाचा फ्रँचाईजी असलेल्या इंश्योरकोट स्पोर्ट्सने आपला आणखी एक संघ खेळाच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. कबड्डीनंतर आता पुणेरी पलटण हा टेबल टेनिसचा संघ मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. अल्टीमेट टेबल टेनिसच्या तिसऱ्या हंगामात पुण्याचा संघ मैदानात उतरेल. 

विवो प्रो कबड्डी लीग मध्ये पुणेरी पलटण संघाला पुणेकरांनी उत्सुफूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर इंश्योरकोट स्पोर्ट्सने आता पुणेरी पलटण या नावाने टेनिसचा संघ खरेदी केला आहे. अल्टीमेट टेबल टेनिसमध्ये सहभागी होत इंश्योरकोट स्पोर्ट्सने क्रिडा क्षेत्रातील आपली व्याप्ती वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.  

नव्या संघाच्या खरेदीनंतर इंश्योरकोट स्पोर्ट्सचे सीईओ कैलाश कांडपाल म्हणाले की, "टेबल टेनिस हा जलद गतीचा असा खेळ आहे. या खेळात खूप एकाग्रता लागते. अल्टीमेट टेबल टेनिसमुळे भारतीय खेळाडूंचा खूप फायदा झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ प्रगत होण्यासही मदत झाली. अल्टीमेट टेबल टेनिसमध्ये टीम घेऊन आम्ही त्यांच्या सोबत एकत्र काम करून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी अजून उंचावण्याचा प्रयत्न करू."

यावेळी पुणेरी पलटण टेबल टेनिस संघाचे सहाय्यक संघप्रशिक्षक पराग अग्रवालही उपस्थित होते. ते म्हणाले की, "आमचा संघ संतुलीत आहे कारण आमचा संघ  भारतीय तसेच परदेशातील अनुभवी आणि तरुण खेळाडूंनी बहरलेला आहे. अल्टीमेट टेबल टेनिसमध्ये पुणेरी पलटण टेबल टेनिस संघाचे पहिले पर्व असणार आहे. आम्हाला चाहत्यांना वर्ल्ड क्लास टेबल टेनिसचा अनुभव द्यायचा आहे. त्याचबरोबर देशासाठी सर्वोत्तम टेबल टेनिस खेळाडू घडविणे हे आमचे ध्येय आहे."     
 

पुणेरी पलटण टेबल टेनिसचे खेळाडू    

  • चुयांग ची युआन
  • हरमीत देसाई
  • अयीखा मुखर्जी
  • सेलेना सेल्वाकुमार
  • रोनित भानजा
  • सबिन विंटर       
  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Insurekot Sports Pvt Ltd Franchise Holder of Puneri Paltan Kabaddi Team new team in Ultimate Table Tennis UTT by the name of Puneri Paltan Table Tennis