पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvWI 1st Test : पंतने संधी गमावली, जडेजावर कौतुकाचा वर्षाव

पंत आणि जडेजा

विडींज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनच्या जागी मिळालेल्या संधीतं रविंद्र जडेजानं सोनं केलं. दुसऱ्या दिवशीच्या डावाला सुरुवात होताच ऋषभ पंतने मैदाना सोडले. मात्र दुसऱ्या बाजूला रविंद्र जडेजाने ईशांत शर्माच्या साथीनं छोटेखानी पण महत्त्वपूर्ण भागीदारी रचत भारताची धावसंख्या २९७ पर्यंत पोहचवली. 

पहिल्या दिवसाअखेर २० धावांवर नाबाद असलेल्या पंतने ४ धावांची भर घालून तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर जडेजाने ईशांत शर्मासोबत आठव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारतीय संघाने २९७ धावा करणे शक्य झाले. जडेजाच्या या खेळीचे नेटकरी कौतुक करत आहेत. जडेजावर कौतुकाचा वर्षाव सुरु असताना पंतच्या कामगिरीवर अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.