पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvBAN 3rd T20: कर्णधार रोहितचे पंतविषयी मोठं विधान

पंत आणि रोहित शर्मा

इंग्लंडमधील विश्वचषकापासून खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या युवा यष्टिरक्षक ऋषभ पंतने राजकोटच्या मैदानात अतिउत्साहात केलेल्या चुकीच्या स्टंपिंगमुळे चर्चेत आला होता. सध्याच्या घडीला त्याला चांगली स्पर्धा देणारा संजू सॅमसन देखील संघात आहे. त्यामुळे तिसऱ्या टी-२० मध्ये पंत की सॅमसन असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निश्चित निर्माण होऊ शकतो. मात्र रोहित शर्माने पंतची पाठराखण केली आहे. 

कांगारुंना पुन्हा धक्का! आणखी एकाने तणावामुळे घेतली माघार

तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यापूर्वी रोहित म्हणाला की, पंत विषयी सध्या अनेक चर्चा रंगत आहेत. पण आपण त्याच्यावर दबाव टाकायला नको, असे मला वाटते. त्याला मुक्तपणे खेळायला द्यायला हवे. पंतविषयी उलट-सुलट चर्चा करणे सध्याच्या घडीला योग्य वाटत नाही, असा उल्लेखही रोहितने केला आहे.  तो पुढे म्हणाला की, पंत हा निडर खेळाडू आहे. त्याच्यातील याच गुणामुळे संघ व्यवस्थापन त्याला अधिक संधी देत आहे. त्याला मोकळेपणाने खेळू द्या. हळूहळू तो परिपक्व होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केले.  

INDvBAN: वादळ घोंगावलं, पण रोहितचं! भारताची मालिकेत बरोबरी

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ सामना जिंकला असून नागपूरमध्ये मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील. भारतीय संघ पंससोबतच मैदानात उतरेल, याचे संकेतच रोहितने सामन्यापूर्वी दिले आहेत.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:INDvBAN rohit sharma gave this big statement about Pant before third T20 International match against bangladesh