पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गब्बर वनडे मालिकेलाही मुकणार, मयांकला मिळणार संधी

दुखापतीमुळे शिखर धवन भारतीय संघाबाहेर पडला आहे

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन विडींज विरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिकेलाही मुकणार असल्याचे वृत्त आहे. सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीतून तो अद्यापही सावरलेला नाही. यापूर्वी टी-२० मालिकेत त्याची निवड करण्यात आली होती. मात्र अखेरच्या क्षणाला त्याच्या जागील संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला होता. 

धोनीसाठी मनापासून लिहिलेल्या विराटच्या 'त्या' पोस्टचाही अनोखा विक्रम

भारतीय संघ व्यवस्थापनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय निवड समितीने एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवनच्या जागी मयांक अग्रवालचे नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मयांक अग्रवाल भारताच्या डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत मयांकने जोरदार कामगिरी केली होती. तशीच कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित आहे. 

 दुखण्यात खेळून हार्दिक पांड्यानं मोठी चूक केली

भारत आणि विंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना बुधवारी मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात रंगणार आहे. या मालिकेनंतर १५ डिसेंबरला चेन्नईच्या मैदानात पहिल्या एकदिवसीय सामना नियोजित आहे. दुसरा सामना १८ डिसेंबरला विशाखापट्टणम तर तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना हा २२ डिसंबरला कटकच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Indias Test opener Mayank Agarwal is likely to replace Shikhar Dhawan in the upcoming three match ODI series against the West Indies