पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो याचा अजूनही विश्वास बसत नाही : राणी

राणी रामपाल

टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आम्ही पात्र झालो आहोत, याचा मला आणि माझ्या संघातील सहकार्यांना अजूनही विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने दिली आहे. भारतीय महिला हॉकी संघाने शुक्रवारी अमेरिकन महिलांना ५-१ असे पराभूत कले होते. त्यांनतर शनिवारी दुसऱ्या सामन्यात अमेरिकेने  भारतीय महिला संघाला ४-१ असे पराभूत केले. मात्र सरासरी गुण प्रणालीनुसार भारतीय महिला संघाने ६-५ अशा गुणांसह ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरला.  

IND vs BAN: दिल्लीत भारत जिंकला असता बांगलादेशने 'दंगल' केली असती

ऑलिम्पिकचे तिकीट मिळाल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार राणी रामपाल हरियाणाला आपल्या घरी आली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. "मला वाटते आमच्यामध्ये अजूनही कुठेतरी भीतीचे वातावरण आहे. आम्ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलोय याचा आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही. दुसरा सामन्यात विजय मिळायला हवा होता. मात्र आम्हाला दुसरा सामना गमवावा लागला. पात्रता फेरीतील सामन्यात भारतीय संघ ५-५ असा बरोबरीत होता.

China Open : सिंधू आउट! बिगर मानांकित प्रतिस्पर्ध्यासमोर हतबल

मात्र कर्णधार राणी रामपालने केलेल्या गोलमुळे सरासरीमध्ये भारताने ६-५ असा विजय नोंदवत ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. हाफ टाइममध्ये कोच शूअर्ड मरिने यांच्यासोबत केलेल्या चर्चेमुळे सामन्याचा निकाल फिरला, असेही राणीने यावेळी सांगितले. राणी म्हणाली की, "हाफ टाइम वेळी प्राशिक्षक शुअर्ड आमच्या कामगिरीवर नाराज होते. मात्र त्यांनी आम्हाला सांगितले की, सर्व काही संपलेले नाही. सध्या ०-० असा स्कोअर आहे, असे समजून खेळा. या मार्गदर्शनामुळे आमच्यात नवा उत्साह निर्माण झाला, असे ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Indian Womens Hockey Team Captain rani rampal pours her heart out talking about indias journey to tokyo olympics 2020