पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Women Hockey : चक दे इंडिया! फायनलमध्ये यजमान जपानचा धुव्वा

भारतीय महिला संघाने फायनल जिंकली

हिरोशिमा येथे रंगलेल्या एफआयएच सीरिज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरच्या २ गोलच्या जोरावर भारताने यजमान जपानला ३-१ असे नमवत स्पर्धेवर आपला ठसा उटवला आहे. रविवारी हिरोशिमा येथील हॉकीच्या मैदानात रंगलेल्या अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय महिलांनी दमदार खेळ दाखवला. त्यांनी आशियाई चॅम्पियन जपानच्या महिलांना हावी होण्याची एकही संधी दिली नाही. 

खेळाच्या सुरुवातीच्या तिसऱ्या मिनिटालाच कर्णधार रानी रामपालने गोल डागत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जपानच्या महिलांकडून कानोन मोरीने ११ व्या मिनिटाला गोलची परतफेड करत सामन्यात बरोबरीत साधली.  त्यानंतर ड्रॅग फ्लिकर गुरजीतने ४५ व्या आणि ६० व्या मिनिटाला गोल डागत भारताला ३-० असा विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. 

Video : ब्रेथवेट! पराभवानंतर जिंकलेला 'बाजीगर'

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात मजल मारत भारतीय महिलांनी २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्रता सामन्याचे तिकिट मिळवले होते. आशियाई चॅम्पियन्सला पराभूत करुन हॉकीची महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघातील  महिला खेळाडूंनी नृत करत आनंद साजरा केला.