कोरोना विषाणूच्या विरोधातील लढा जिंकण्यासाठी देशात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आलाय. या कठोर निर्णयामुळे अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या मदतीसाठी आता भारतीय महिला हॉकी संघानेही पुढाकार घेतलाय. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या गरिब मजुरांना अन्न धान्याचा पुरवठा करण्यासाठी भारतीय महिला संघ ऑनलाइनच्या माध्यमातून एक नवा आणि अनोखा उपक्रम सुरु करणार आहे.
Video: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात
देशव्यापी बंद दरम्यान भारतीय महिला खेळाडूंकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना फिटनेस चॅलेंज देण्यात येणार आहे. यासंदर्भात भारतीय महिला संघाची कर्णधार राणी रामपाल म्हणाली की, सध्याच्या परिस्थितीत अनेक लोकांचा भोजनासाठी संघर्ष सुरु आहे. ऑनलाइन फिटनेस चॅलेंजच्या माध्यमातून संघाने अशा लोकांसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास हजार कुटुंबियांना भोजन दिले जाऊ शकेल एवढी मदत जमा करण्याचा भारतीय महिला संघ प्रयत्न करणार आहे.
US ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेबाबतचा 'फैसला' जूनमध्ये होणार!
भारतीय महिला हॉकी संघाची उपकर्णधार सविताने फिटनेस चॅलेंज फंडा नेमका कसा असेल, याची माहितीही दिली. ती म्हणाली की, प्रत्येक दिवशी आमच्या संघातील एक खेळाडू देशवासियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सोप्या व्यायामाचे चॅलेंज देईल. जो हे चलेंज स्वीकारेल त्याने १०० किंवा त्यापेक्षा अधिक मदत करेल. एवढेच नाही तर तो १० लोकांना पुढे हा संदेश शेअर करेल. सविता पुढे म्हणाली की, भारतीय महिला हॉकी संघातील बऱ्याच खेळाडूंना गरिबीची जाण आहे. एकेकाळी आमच्यामधील काहींनाही अन्नासाठी संघर्ष करावा लागला आहे, त्यामुळेच गरिबांची सध्याची परिस्थिती किती बिकट आहे, याची आम्हाला कल्पना आहे, असा भावनिक उल्लेखही सविताने केलाय. ऑनलाइन चॅलेंजच्या माध्यमातून जी आर्थिक मदत जमा होईल ती दिल्लीस्थित उदय फांउडेशन नावाच्या सामाजिक संस्थेला देण्यात येणार असून ही संस्था गरिबांपर्यंत मदत पोहवण्याचे काम करणार आहे.