पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून संघ व्यवस्थापनानेच धोनीला निवृत्तीपासून रोखलय

महेंद्रसिंह धोनी

भारतीय संघाला एका वेगळ्या क्षितिजावर नेऊन ठेवणाऱ्या माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत क्रिकेट वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातून धोनीने स्वत: माघार घेतली. त्याच्या या निर्णयानंतर धोनी पुन्हा मैदानात खेळताना दिसेल का? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला. काहींनी त्याचा हा निर्णय निवृत्तीची चाहूल असल्याचे म्हटले. मात्र धोनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपर्यंत टीम इंडियासोबत राहणार असल्याची माहिती सूत्राकंडून मिळाली आहे.

सध्याच्या घडीला धोनीने निवृत्ती घ्यावी, असे भारतीय संघ व्यवस्थापनाला देखील वाटत नाही. विंडीज दौऱ्यातील संघ निवडीवेळी ऋषभ पंत पहिली पसंती असणार असे एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. पण आगामी टी-२० विश्वचषकामध्ये पंत दुखापतग्रस्त झाला तर भारतीय संघासमोर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच धोनीला निवृत्तीपासून भारतीय व्यवस्थापनानेच रोखल्याचे बोलले जात आहे.  

'या' खेळाडूत धोनीची जागा घेणाऱ्या पंतला टक्कर देण्याची क्षमता

सूत्रांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार,  'धोनी आपली भूमिका आणि सध्याची परिस्थितीला चांगल्या पद्धतीने ओळखतो. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पंतला त्याचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, असे भारतीय संघ व्यवस्थापनाला वाटते. तो कोणत्याही क्षणी संघासाठी उपलब्ध राहावा, अशीच त्यांची धारणा आहे. पंतला दुखापत झाली तर धोनीला तोड देणारा यष्टिरक्षकाते नाव सध्याच्या घडीला सांगता येत नाही, त्यामुळे धोनी संघासोबत असावा, ही व्यवस्थापनाची इच्छा आहे.  

धोनीच्या निवृत्तीवर एमएसके प्रसाद यांची रिअ‍ॅक्शन

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: indian team management asks ms dhoni not to retire before 2020 t20 world cup as rishabh pant needs grooming