पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तेजक द्रव्यांचे सेवन भोवले, शेरॉनवर पदकाची मंदी अन् ४ वर्षांची बंदी

निर्मला शेरॉन

भारताची  धावपटू निर्मला शेरॉन डोपिंगमध्ये दोषी आढळली आहे. तिच्यावर चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली असून २०१७ मध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेली पदक काढून घेण्यात आली आहेत. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने  ४०० मीटर आणि ४ × ४०० मीटर रिले प्रकारात दोन पदकांची कमाई केली होती. 

मिताली 'राज'! तेंडुलकर, मियादांद अन् जयसूर्या या दिग्गजांच्या यादीत

२४ वर्षीय निर्मला शेरॉन हिची जून २०१८ मध्ये भारतात झालेल्या एका स्पर्धेदरम्यान स्टेरॉइड ड्रोपोस्टोन आणि मेटेनोलोन उत्तेजक द्रव्यांचे सेवन चाचणीत ती दोषी आढळली आहे. धापटूने आपली चूक मान्य केली आहे.  

INDvsSA: ऐतिहासिक शहरातील मैदानात टीम इंडियाला इतिहास घडवण्याची संधी

या प्रकरणात अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी यूनिट (AIU) ने दिलेल्या माहितीनुसार, निर्मला शेरॉन हिने आपली चूक मान्य केली असून तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. २९ जून पासून ही कारवाई लागू असून तिला चार वर्षे तिला मैदानात उतरता येणार नाही.