पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून फुलराणी सायनाने मागितली चाहत्यांची माफी

सायना नेहवाल

भारताची आघाडीची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) च्या पाचव्या हंगामातून माघार घेतली आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या सायनाने ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. दुखापतीमुळे यापूर्वी सायनाने कोरिया ओपन स्पर्धेतून माघार घेतली होती.   

'कुलिंग पीरियड' नियम बदलणार? दादासह भारतीय क्रिकेटला होईल फायदा

२० जानेवारी २०२० पासून ९ फेब्रुवारी या कालावधीत प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या पाचव्या हंगामातील सामने रंगणार आहे. सायनाने ट्विटमध्ये लिहिलंय की, मी पीबीएलच्या पाचव्या हंगामात सहभागी होऊ शकत नाही. यावर्षी मला दुखापतींचा सामना करावा लागला. यातून सावरुन पुन्हा चांगली सुरुवात करण्यासाठी मला मेहनत घ्यायची आहे. त्यामुळे पीबीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल मी चाहत्यांची माफी मागते, असा उल्लेखही तिने आपल्या ट्विटमध्ये केला आहे. सहाव्या हंगामात खेळण्याचा विश्वासही तिने व्यक्त केलाय.   

क्रिकेटला भ्रष्टाचारमुक्त करा, रायडूचा अझरुद्दीनवर पलटवार

आयपीएलच्या पार्श्वभूमीवर बॅडमिंटनला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय बडमिंटन महासंघाच्या मान्यतेने पीबीएल स्पर्धा खेळवण्यात येते. आगामी हंगामात दिल्ली, लखनऊ, बेंगळुरू आणि चेन्नई या शहरात पीबीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत.