पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन नेमबाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा डंका!

शुटींग रेंजवरील एक संग्रहित छायाचित्र

कोरोना विषाणूचे जगभरात वेगाने होणाऱ्या संक्रमणाच्या काळात सर्व इनडोअर आणि आउटडोअर क्रीडा स्पर्धा स्थगित असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच ऑनलाइन नेमबाजी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी कमालीची कामगिरी नोंदवली. भारताची अनुभवी अमनप्रीत सिंह, मनु भाकर आणि मेघना सज्जनार यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. 

...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं

ऑस्ट्रेयाच्या मार्टिन स्ट्रेम्फलने १० मीटर एयर रायफल स्पर्धेत ६३२.५ अंक प्राप्त करत अव्वल स्थान पटकावले. तर  भारताकडून सज्जनारने ६३०.५ अंकासह दुसरे स्थान मिळवले. फ्रान्सच्या इटिएने गर्मोंडला ६२९.४ अंकासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जागतिक नेमबाजीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताच्या दिव्यांश सिंह पंवार  चौथ्या स्थानावरच थबकला. त्याने ६२७.८ अंक मिळवले.दुसरीकडे १० मीटर एअर पिस्टल प्रकारात अमनप्रीतने अव्वलस्थान मिळवले. आशीष डब्बासने दुसरे तर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध केलेल्या मनु भाकरने तिसरे स्थान मिळवले.

मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधातील सामना निश्चित जिंकू : शास्त्री

ऑनलाइनच्या माध्यमातून नेमबाजीमध्ये घेण्यात आलेली ही पहिली स्पर्धा होती. यासाठी एक इलेक्ट्रॉनिक सेटअप आणि इंटरनेट कनेक्शन असणारा मोबाईलची आवश्यकता होता. या स्पर्धेत सात देशांतील ५० नेमबाज सहभागी झाले होते. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाने सर्व स्पर्धा रद्द केल्या असून यात नेमबाजीतील विश्वचषक स्पर्धेचाही समावेश आहे.