इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 12 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील एलिमिनेटर लढतीत काही गंमतीदार क्षण पाहायला मिळाले. यात हैदराबादचा गोलंदाज खलील अहमदचा अनोख्या अंदाजातील सेलिब्रेशनचा समावेश होता.दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केल्यानंतर खलीलने हटके अंदाजात आनंद व्यक्त केला. मैदानात त्याने केलेल्या हावभावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्लीच्या डावातील 11 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर खलील अहमदने श्रेयस अय्यरला यष्टिरक्षक साहकरवी झेलबाद केले. त्यानंतर त्याने नंबर डायल करुन कोणाला तरी कॉल करत असल्याची कृती करत विकेट घेतल्याचं कोणाला तरी सांगत असल्याची हावभाव करुन दाखवली होती. त्याच्या या हॅलोवाल्या अंदाजाचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.
What do you reckon Khaleel was trying to convey to Shreyas?#Eliminator #DCvSRH pic.twitter.com/vELwzcxmIw
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2019
पंतनं दिल्लीचं तख्त राखलं, नवाबांची घरवापसी!
यावर अनेक नेटकरीही गंमतीदार प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका नेटकऱ्याने त्याने बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांना कॉल करुन विकेट घेतल्याचे सांगत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.