आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने लावलेल्या ऐतिहासिक बोलीला आयपीएल प्रशासकीय समितीने (गव्हर्निंग काउंसिल) सुरुंग लावला आहे. लिलावात कोलकाताने खरेदी केलेल्या ४८ वर्षीय फिरकीपटू प्रविण तांबेला आयपीएलमधून अपात्र घोषीत करण्यात आले आहे. आयपीएल गव्हर्निंग काउंसिलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल यांनी यासंदर्भात पुष्टी केली आहे. तांबेने निवृतीची घोषणा केल्यानंतर मुंबई लीगमधून खेळला होता. याशिवाय दुबई लिगमध्ये विना परवानगी खेळत त्याने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याला अपात्र ठरवण्यात आल्याचे ब्रजेश पटेल यांनी म्हटले आहे.
रहाणेचा सवंगड्यांना कोहलीपेक्षा वेगळा सल्ला
ब्रजेश पटेल यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, तांबेने निवृत्ती घेतल्यानंतर मुंबई लीगमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर कोणत्याही परवानगीशिवाय तो दुबईमध्ये खेळण्यासही गेला. आम्ही त्याला आयपीएलमध्ये खेळण्यास अपात्र घोषीत केले आहे. याची माहिती कोलकाताच्या संघाला दिली असून त्यांनी त्याच्या जागी बदली खेळाडू मिळेल, असेही ते म्हणाले.
विक्रमी खेळीनंतर शेफाली म्हणाली, मुलांसोबत खेळल्याचा फायदा झाला
यंदाच्या आयपीएलसाठी मागील वर्षी १९ डिसेंबरला कोलकातामध्ये झालेल्या लिलावात कोलकाताने प्रविण तांबेला २० लाख रूपये या मूळ किंमतीमध्ये खरेदी केले होते. त्याला खरेदी करत सर्वात वयोवृद्ध खेळाडू ताफ्यात घेण्याचा अनोखा विक्रम कोलकाताच्या नावे जमा झाला होता. २०१३ पासून २०१६ पर्यंत तांबेने ३३ आयपीएल सामने खेळले आहेत. राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या वेगवेगळ्या संघाकडून त्याने प्रतिनिधीत्व केले होते. तांबेने आयपीएलमध्ये एकूण २८ बळी टिपले होते. यातील १५ विकेट्स त्याने २०१४ च्या हंगामात टिपल्या होत्या.