पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPLची फायनल मुंबईत, सामन्याच्या वेळेतही बदल नाहीः सौरव गांगुली

IPL फायनल मुंबईत, सामन्याच्या वेळेत बदलीही नाहीः सौरव गांगुली

आयपीएलच्या १३ व्या हंगामाची सुरुवात यावर्षी २९ मार्चपासून होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सोमवारी आयपीएल नियामक समितीची बैठक झाली. त्यात रात्रीच्या सामन्याच्या वेळेत कोणताच बदल करता आलेला नाही. काही भागधारकांकडून रात्रीच्या सामन्याची वेळ ८ ऐवजी ७.३० करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता.

रवींद्र जडेजाने मांजरेकरला केले ट्रोल, मिळाले हे उत्तर

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले की, आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये नव्हे तर मुंबईत खेळवला जाईल. त्याचबरोबर आयपीएल सुरु होण्यापूर्वी एक ऑल स्टार्स सामना चॅरिटीसाठी खेळवला जाईल. या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू सहभागी होतील. 

धावांचा पाठलाग कसा करायचा हे कोहलीकडून शिकलोः श्रेयस अय्यर

बैठकीनंतर गांगुली म्हणाले की, आयपीएलच्या रात्रीच्या सामन्यामध्ये कोणतेच बदल केले जाणार नाहीत. सामना साडेसात वाजता सुरु करण्याबाबत चर्चा सुरु होत्या. पण असे बदल झालेले नाहीत. यावेळी केवळ पाच दिवस असे असतील जेव्हा एकाच दिवशी दोन सामने खेळवले जातील.

दरम्यान, माजी क्रिकेटपटू मदनलाल आणि सुलक्षणा नाईक हे राष्ट्रीय निवड समितीच्या उमेदवारांची मुलाखत घेतील.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:indian premier league 13th season ipl 2020 No change in night game start timing of 8pm final in Mumbai says bcci president sourav ganguly