इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) हंगामात फलंदाज, गोलंदाज आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या संघानीच नव्हे तर नेटकऱ्यांनीही अनोखा विक्रम नोंदवला आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेदरम्यान क्रिकेट चाहत्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त होताना तब्बल २.७ कोटी ट्विटस केली आहेत. हा नेटकऱ्यांनी केलेला एक अनोखा विक्रमच आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आकडा आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा ट्विटचा आकडा ४४ टक्के इतका वाढला.
यंदाच्या स्पर्धेत चौथ्यांदा विजेतेपद पटकावत मुंबई इंडियन्सने जरी नवा विक्रम आपल्या नावे प्रस्थापित केला असला तरी ट्विटरचा ट्रेंडमध्ये ठसा उमटवण्यात ते मागे पडले आहेत. ट्विटरवर सर्वाधिक पसंतीची टीमच्या यादीत धोनीची चेन्नईच सुपर ठरली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या संदर्भात सर्वाधिक ट्विट करण्यात आले आहेत.
IPL चा फायदा झाला, पाकच्या धुलाईनंतर जॉनीचे बोल
यात हार्दिक पांड्याने महेंद्रसिंह सोबतच्या फोटोसह केलेल्या ट्विटची सर्वाधिक चर्चा झाली. "माझे प्रेरणास्थान, माझा दोस्त, माझा भाऊ, माझा आदर्श महेंद्रसिंह धोनी" असा उल्लेख हार्दिक पांड्याने आपल्या ट्विटमध्ये केला होता. पांड्याने शेअर केलेला हा फोटो १६ हजार नेटकऱ्यांनी रिट्विट केला तर १ लाख लोकांनी त्याला पसंती दिली.
ट्विटर ट्रेण्डमध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाबद्दल सर्वाधिक ट्विट करण्यात आले तर यात मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता नाइट राइडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा नंबर लागतो. खेळाडूंमध्ये धोनी अव्वलस्थानी असून विराट कोहली दुसऱ्या स्थानावर राहिला.