पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी-ट्रम्प भेटीची इम्रान खान यांना धास्ती

इम्रान खान

फ्रान्समध्ये आयोजित जी ७ परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) अमेरिकन राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या दोन प्रमुख नेत्यांच्या भेटीमध्ये काश्मीरच्या मुद्यावर चर्चा होईल, असे मानले जात आहे. त्यामुळे इम्रान खान यांचे धाबे दणाणले आहेत. या दोन नेत्यांच्या भेटीपूर्वी इम्रान खान पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करणार आहेत. पाकिस्तान पंतप्रधान सूचना आणि प्रसारण विशेष सहाय्यक फिरदास आशिक अवान यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

G7 Summit 2019 : काश्मीरच्या पार्श्वभूमीवर मोदी-ट्रम्प भेटीला महत्त्व

इम्रान खान काश्मीरमधील सध्य परिस्थितीवर खास भाष्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ५ ऑगस्ट रोजी मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.  याशिवाय राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशात विभागणी करण्यात आली होती. तसेच फुटीरवादी नेत्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते. काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायासममोर केला होता. 

जम्मू-काश्मीरः दगडफेकीत स्थानिक ट्रक चालकाचा मृत्यू

इम्रान खान यांचे काही ट्विट देखील चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले. अफगाणिस्तानमधील काही दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश केल्याचा दावा भारतीय प्रसारमाध्यमांनी केला आहे. काश्मीरमधील मुस्लिम बांधवांवर होणाऱ्या अत्याचार दुर्लक्षित करण्याचा हा भारताचा डाव आहे, असे ट्विट इम्रान यांनी केले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: indian pm modi and american president donald trump meeting in france after that pakistan pm imran khan will adrress nation on kashmir issue