पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाराजीचा शेवट थेट निवृत्तीनं, रायडूचा क्रिकेटला 'रामराम'

अंबाती रायडू

भारतीय संघातील मध्यफळीतील फलंदाज अंबाती रायडूनं सर्व क्रिकेट प्रकारातून निवृतीची घोषणा केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, यासंदर्भात त्याने बीसीसीआयला पत्र लिहिले आहे. विश्वचषक स्पर्धेत चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायडूची चर्चा होती. पण त्याची संघात निवड झाली नव्हती.

विश्वचषकासाठी भारतीय संघात वर्णी न लागल्याने त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून बीसीसीआयवरील नाराजी व्यक्त केली होती. विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी आता थ्रीडी गॉगल मागवतोय, असे ट्विट करत  रायडूने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भारतीय निवड समितीने राखीव खेळाडूमध्ये ऋषभ पंतसह रायडूच्या नावाची घोषणा केली. धवन दुखापत झाल्यानंतर बीसीसीआयने पंतला इंग्लंडला बोलवले.

विशेष म्हणजे विजय शंकरच्या दुखापतीनंतर राखीव खेळाडू म्हणून निवडलेल्या अंबाती रायडूऐवजी बीसीसीआयने एकही वनडे सामना न खेळलेल्या मयंक अगरवालला संघात स्थान दिले. या घटनेनंतर रायडूनं आता क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृतीची घोषणा केली आहे. 

केदारला दुखापत, रायडू थ्रीडी गॉगल्सची ऑर्डर रद्द करणार?

 एकदिवसीय क्रिकेटमध्ये  ५५ सामन्यातील ५० डावात अंबाती रायडूने ४७.०६ च्या सरासरीनं  १ हजार ६९४ धावा केल्या आहेत. यात १२४ या सर्वोच्च धावसंख्येसह ३ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० प्रकारात ६ सामन्यातील ५ डावात त्याच्या नावे अवघ्या ४२ धावांची नोंद आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Indian middle order batsman Ambati Rayudu has announced his retirement from all forms of cricket