पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Pro Kabaddi 7 : केदार जाधवच्या हस्ते पुणेरी पलटणच्या घरच्या हंगामाची सुरुवात

 १४ सप्टेंबरपासून पुणेरी पलटणच्या घरच्या मैदानावरील सामन्यांना सुरुवात झाली.

प्रो-कबड्डीचा सातवा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. १४ सप्टेंबरपासून पुणेरी पलटणच्या घरच्या मैदानावरील सामन्यांना सुरुवात झाली. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधवच्या हस्ते या हंगामाचा श्रीगणेशा करण्यात आला.   
बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पुणेरी पलटण विरुद्ध गुजरात फॉर्च्युनजाएंट यांच्यातील सामन्यापूर्वी केदार जाधवची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

 

INDvsSA,1st T20 : सलामीच्या सामन्यात पाऊस बॅटिंग करणार?

यंदाच्या हंगामात पुणेरी पलटणला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण पुणकरांचे आपल्या संघावरील प्रेम कमी झालेले नाही.  घरच्या मैदानातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद त्याची अनुभूती करुन देणारा होता. सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या आपल्या चाहत्या वर्गाला पुणेरी पलटणने देखील नाराज केले नाही. 

INDvsSA, 1st T20: विराट-रोहितची 'या' विक्रमांवर असेल नजर

आपल्या घरच्या प्रक्षकांसमोर दमदार विजय नोंदवत पुणेरी पलटणने प्रेक्षकांची मनं जिंकली.  घरच्या मैदानातील सलामीच्या सामन्यात पुणेरी पलटणने गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला ४३-३३ अशा फराकाने पराभूत केले. सलामीच्या सामन्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात हरयाणा स्टिलर्सने तामिळ थलायवाजला ४३-३५ असे पराभूत करत प्ले ऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आज पुणेरी पलटण पाटणा पायरेट्सविरुद्ध पंगा असून २० सप्टेंबरपर्यंत याठिकाणी प्रोकबड्डीचा थरार पाहायला मिळणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Indian cricketer Kedar Jadhav support the home team Puneri Paltan in VIVO Pro Kabaddi League at Shree Shiv Chhatrapati Sports Complex Mahalunge Balewadi