पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Under-19WC: भारत-पाक मेगा लढतीपूर्वी दोन्ही संघातील रेकॉर्डवर एक नजर

भारत-पाक सेमीफायनलमध्ये भिडणार

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सुपरलीग सेमीफायनमधील लढतीसंदर्भातील चित्र स्पष्ट झाले आहे. युवा भारतीय संघाची लढत ही पारंपारिक प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या  पाकिस्तानविरुद्ध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताने सेमीफायनल गाठली होती. तर  शुक्रवारी सुपर लीगच्या क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानला ६ गडी राखून पराभूत करत सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे. 

Video: धोनीच्या फिरकीवर साक्षीचा कडक स्ट्रेट ड्राईव्ह

४ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. पोचेफस्ट्रूम येथील सेनवस पार्कच्या मैदानात दुपारी दीड वाजता हा सामना रंगणार आहे. या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनला सामना हा ६ फेब्रुवारीला न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात रंगणार असून ९ फेब्रुवारीला फायनलमध्ये कोणत्या दोन संघात सामना रंगणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. युवा भारतीय संघाने आतापर्यंत चारवेळा विश्वचषक उंचावला असून पाचव्यांदा विश्वचषक उंचावण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.

टीम इंडियाची टी-२० सामन्यात अनोखी हॅटट्रिक

१९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत २३ सामने झाले आहेत. यात १४ सामन्यात भारताने बाजी मारली आहेत तर ८ सामन्यात पाकिस्तानने विजय नोंदवला असून एक सामना टाय झाला आहे. दोन्ही संघातील विश्वचषकातील रेकॉर्ड हे पाकिस्तानच्या बाजूने झुकणारे आहेत दोन्ही संघातील ९ सामन्यात भारतीय संघाला ४ सामन्यात विजय मिळाला आहे तर ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. सेमीफायलन जिंकून भारताला विश्वचषकातील रेकॉर्ड सुधारण्याची संधी आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: indian cricket team will play against pakistan in icc under 19 cricket world cup semifinal