पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरुण जेटलींचे निधन : भारतीय संघ काळ्या फिती बांधून मैदानात उतरणार

भारतीय संघ जेटलींना वाहणार श्रद्धांजली

भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) माजी केंद्रीय मंत्री आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण जेटली यांच्या निधनानंतर ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. जेटली हे प्रतिभावंत राजकारणी आणि सक्षम क्रिकेट प्रशासक होते, असा उल्लेख बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये केलाय. 

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

आँटिग्वाच्या मैदानावर भारत आणि विंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघ काळ्या फिती बांधून अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे. उल्लेखनिय आहे की, अरुण जेटली १३ वर्षे दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. १९९९ ते २०१२ या दरम्यान त्यांनी अध्यक्षपदाची धूरा सांभाळली होती. दिल्लीच्या अनेक खेळांडूना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात जेठलींचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 

जेटली माझ्यासाठी वडिलांसमान होते, गंभीरचे भावूक ट्विट

जेटलींच्या निधनाच्या वृत्तानंतर गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, आकाश चोप्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. जेटली यांच्या कार्यकाळामध्ये गंभीर, सेहवाग, शिखर धवन, विराट कोहली आणि ईशांत शर्मा या दिल्लीकरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. या खेळाडूंच्या यशात अप्रत्यक्षपणे जेटलींचे योगदान आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Indian cricket team to wear black arm bands in its match against West Indies today to condole the demise of Former Finance Minister Arun Jaitley