पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियाच्या 'सुपर फॅन' चारुलता आजींचं निधन

चारुलता आजींचं निधन

विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात ८७ वर्षांच्या  चारूलता आजींनीं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. व्हिल चेअरवर बसलेल्या या आजींचा उत्साह उपस्थित असलेल्या सर्व तरूण वर्गाला लाजवेल असाच होता. मात्र टीम इंडिया त्यातूनही विराटच्या चाहत्या असलेल्या आजींचं १३ जानेवारीला निधन झालं.  

मुंबई- भुवनेश्वर LTT एक्स्प्रेसचे ८ डब्बे रुळावरुन घसरले, २० जखमी

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनांची बातमी समजली. १३ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ''भारतीय संघाच्या सुपरफॅन चारुलताजी या कायमस्वरुपी आमच्या हृदयात राहतील, क्रिकेटप्रती असलेलं त्याचं प्रेम आम्हाला नेहमीच चांगलं खेळण्यासाठी प्रेरणा देईल'', असं बीसीसीआयनं म्हटलं आहे. 

 वर्ल्ड कप मॅचदरम्यान चारुलता चर्चेत आल्या होत्या. विराट कोहलीनं चारुलता यांचे फोटो ट्विटवर शेअर केले होते. तसेच स्टेडिअमध्ये बसलेल्या चारुलता यांच्या जागेवर जात विराटनं सामना संपल्यानंतर त्यांचे आशीर्वादही घेतले होते. 

सतत उत्साही, प्रफुल्लित राहण्यासाठी ट्विटरचे CEO काय करतात माहितीये?