पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ड्रेसिंगरुममध्ये दादागिरीची संस्कृती नाही : कोहली

ड्रेसिंगरुममधील वातावरण खेळीमेळीचं

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या विंडीज दौऱ्यापूर्वी अल्प विश्रांतीवर आहे. या दरम्यान त्याने एका मुलाखतीमध्ये ड्रेसिंग रुममधील वातावरण खेळीमेळीचे असल्याचे सांगितले. संघातील सहकार्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असेही त्याने स्पष्ट केले.   

'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराट म्हणाला की, "ज्याप्रमाणे मी महेंद्रसिंह धोनीशी  मोकळेपणाणे बोलतो अगदी तशीच वर्तणूक कुलदीप यादवसोबतही ठेवतो. आमच्या ड्रेसिंगरुममध्ये दादागिरीची संस्कृतीच नाही. इथे प्रत्येक खेळाडूला मत मांडण्याचे स्वतंत्र आहे."   

अजिंक्य, शुभमन वनडे संघात का नाहीत? गांगुलीचा निवड समितीला सवाल

तो पुढे म्हणाला की, "लोकांना (खेळाडू) प्रोत्साहित करणे गरजेच असते. यासाठी त्यांना मोकळीक दिली तरच ते मोकळेपणाने बोलू शकतील. जर संघातील एखादा खेळाडू संघर्ष करत असेल तर मी त्याच्याशी संवाद साधतो. तो काय करतोय आणि त्याला काय करायला हवे, यासंबंधी त्याच्याशी चर्चा करतो. चुकांमध्ये सुधारणा करुन आतापर्यंत खेळलास त्यापेक्षा अधिकवेळ तुला खेळायचं आहे, असा सल्ला मी संघर्ष करणाऱ्या खेळाडूंना देतो." असेही कोहलीने यावेळी सांगितले.