पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेतृत्वाच्या कर्तृत्वाचा 'विराट' विक्रम, धोनीला टाकले मागे

धोनी आणि कोहली

कोलकातामध्ये झालेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यातील विजयासह भारतीय संघाने सलग चारवेळा प्रतिस्पर्ध्यांना एका डावाने पराभूत करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. संघाच्या विक्रमासह कर्नधार विराट कोहलीच्या नावेही एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. ३३ सामन्यात  भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराटने कोलकाताच्या मैदानात संघाला सलग सातवा विजय मिळवून दिला. 

INDvs BAN : ऐतिहासिक कसोटीत टीम इंडियाचा 'विराट' विजय

यापूर्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नृत्वाखाली भारतीय संघाने सलग सहा कसोटी सामने जिंकले होते. धोनीचा हा विक्रम कोहलीने मागे टाकला. २०१३ मध्ये धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार तर विंडीज विरुद्ध दोन कसोटी सामने जिंकले होते. ईडन गार्डन्सच्या मैदानात बांगलादेशला पराभूत करत भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी खिशात घातली. घरच्या मैदानावर भारतीय संघाने बारावी मालिका जिंकली आहे. 

 

INDvsBAN : टीम इंडियाचा विश्वविक्रमी चौकार

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विंडीज दौऱ्यापासून सुरु केलेल्या मालिका विजयाचा धडाका भारतीय संघाने मायदेशातही कायम ठेवला. विंडीज दौऱ्यानंतर भारतामध्ये आलेल्या पाहुण्या दक्षीण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामना आणि बांगलादेश विरुद्ध भारतीय संघाने एकहाती मालिका जिंकण्याच पराक्रम करुन दाखवला. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील विजयाच्या जोरावर आयसीसी वर्ल्ड टेस्ट क्रमवारीत भारताने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. भारतीय संघा ३६० गुणांसह अव्वलस्थानी आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:indian captain virat kohli achieve historical feat against bangladesh surpassed ms dhoni in winning streak