पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंट : बॉक्सर शिव थापा-पूजा राणी यांना सुवर्ण

पूजा रानी

भारतीय बॉक्सर शिव थापा आणि पूजा राणी यांनी टोकियो ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंटमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. गुरुवारी पुरुष गटातील ६३ किलो वजनी गटात शिव थापाने कझाकिस्तानचा राष्ट्रीय चॅम्पियन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कास्य पदकाची कमाई करणाऱ्या सानटाली टोलकायवेला ५-० असे पराभूत केले. यापूर्वी शिव थापाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावले होते. 

'त्या' पराभवाने ताकद कमी असल्याची जाणीव करुन दिली: पंघल

महिला गटात आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या पूजा राणाने  ६९ किलो वजनी गटात सुवर्ण कमाई केली. तिने ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करला पराभूत केले. यापूर्वी या स्पर्धेत माडी ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियन निखात झरीनने ५१ किलो वजनी गटात आणि सिमरनजीत कौरने ६० किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे.

'वर्ल्डकपवेळाी सिलेक्टर्स अनुष्काला चहा देत होते'

पुरुष गटात ६९ किलो वजनी गटातील अंतिम सामन्यातील पराभवामुळे आशीषला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. वहलिमपुया (७५ किलो), आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेता सुमित सांगवानने ९१ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली.