पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संघाकडून सर्वोच्च धावसंख्या १० असूनही भारतीय महिलांनी मारली बाजी

भारताचा आणखी एक विजय

India vs West Indies, 4th T20I, Women Cricket: भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान वेस्ट इंडीजला चौथ्या टी-२० सामन्यातही पराभूत केले. गुयानाच्या मैदानातील या विजयासह भारतीय महिला संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. पावसामुळे प्रत्येकी ९ षटकांच्या सामन्या भारताने ५ धावांनी विजय नोंदवला. दोन्ही संघातील अखेरचा टी-२० सामना २० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.  

धोनीमुळेच शतक हुकलं होतं, तीन धावांची 'गंभीर' कहाणी

वेस्ट इंडीज महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ९ षटकात भारतीय महिलांनी ७ विकेट्स गमावून ५० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना विंडीज महिलांना ९ षटकात ५ बाद ४५ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून पूजा वस्त्राकर हिने सर्वाधिक १० धावांची खेली केली. शेफाली वर्मा ७ , जेमिमा रॉड्रीग्ज ६, वेदा कृष्णमूर्ति ५, कर्णधार हरमनप्रीत कौर ६, तानिया भाटिया ८ धावांचे योगदान दिले.  पूजाशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही.  

पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे क्रिकेटपटूला हार्टअ‍ॅटॅक, पॅव्हेलियनमध्ये मृत्यू

विंडीजकडून हेलन मॅथ्यूज आणि चिनले हेन्री यांनी प्रत्येकी ११-११ तर  नताशा मॅक्लीनने १० धावांचे योगदान दिले. भारताच्या अनुजा पाटीलने दोन षटकात ८ धावा खर्च करुन दोन विकेट घेतल्या तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.