पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Women T20 WC : भारतीय महिलांची विजयी सलामी

भारतीय महिलांची विजयी सलामी

सिडनीच्या मैदानात रंगलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी विजयी सलामी दिली. सलामीच्या सामन्यात त्यांनी यजमान ऑस्ट्रेलियला १७ धावांनी पराभूत केले. ऑस्ट्रेलियन महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर दीप्ती शर्माच्या नाबाद ४९ धावांच्या जोरावर भारतीय महिलांनी यजमान ऑस्ट्रेलियासमोर निर्धारित २० षटकात १३३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. 

NZvsIND Day 1: पृथ्वी, मयांक, पुजारा अन् विराटचा फ्लॉप शो!

भारतीय महिलांनी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. मात्र पूनम यादवच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन महिला फलंदाजांचा निभाव लागला नाही. तिने चार षटकात १७ धावा खर्च करत चार विकेट घेत भारताच्या हातून निसटलेला सामना भारताच्या बाजूने वळवला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीची फलंदाज एलिसा हिली (५१) आणि अ‍ॅश्ले गार्डनरने ३४ धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही समाधानकारक खेळी करता आली नाही. भारताकडून पूनम यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शिखा पांडेला तीन तर राजेश्वरी गायकवाडला एक विकेट मिळाली.     

VIDEO: गर्दीतून धोनीला बाहेर काढण्यासाठी हेअरस्टायलिस्ट झाली बॉडीगार्ड

विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला संघामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले होते. यातील एका सामन्यात भारतीय महिलांनी विजय मिळवला होता या सामन्यासह आता विश्वचषकातील चार सामन्यात भारतीय महिलांनी दोन-दोन अशी बरोबरी केली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. तर २०१० आणि २०१२ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढावली होती.