पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

AUSvsIND Womens T20I Final: स्मृतीचं धमाकेदार अर्धशतक, पण...

स्मृती मानधना

ऑस्ट्रेलियात रंगलेल्या महिला टी-२०  सामन्यांच्या तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय महिलांना यजमान ऑस्ट्रेलियन महिलांनी पराभूत केले. मेलबर्नच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या लढतीत भारतीय महिला संघाला ११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात बेथ मूनेच्या ७१ धावांच्या खेळीच्या जोरावर ६ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली होती. हे आव्हान परतवण्यात भारतीय महिला असमर्थ ठरल्या. ऑस्ट्रेलियाच्या रेचेल हयन्स हिने अखेरच्या ७ चेंडूत केलेल्या १८ धावा भारतासाठी महागड्या ठरल्या. दिप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकावाड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  

पाक क्रिकेटर ब्लॅकमेल करत असल्याचा महिलेचा आरोप

ऑस्ट्रेलिया महिलांनी दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ निर्धारित २० षटकात १४४ धावांवर आटोपला. भारताच्या सलामीची स्फोटक फलंदाज स्मृती मानधनाने ३७ चेंडूत ६६ धावांची दमदार खेळी केली. ती खेळत असताना भारतीय संघ मालिका खिशात घालणार असे वाटत होते. पण ती माघारी फिरल्यानंतर अन्य महिला फलंदाजांना मैदानात तग धरता आला नाही. परिणामी भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी गमावली. ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासन हिने सर्वाधिक पाच विकेट्स मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.  

NZvsIND: नंबर वन बुमराहच्या नावे नकोसा विक्रम!

भारत आणि ऑस्ट्रेलियाशिवाय या स्पर्धेत इंग्लडचा समावेश होता. इंग्लंडच्या महिलांचे आव्हान थोपवून दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात प्रेवश केला होता. या मालिकेतील साखळी सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने खेळले होते. यातील पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सी पराभूत केले. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी त्यांना चक्क ७ विकेट्सनी पराभूत केले होते. इंग्लंड महिलांविरोधीतील दोन पैकी एका सामन्यात भारतीय महिलांना यश आले तर एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. साखळी सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्धचे रेकॉर्ड पाहता भारतीय महिला फायनल मारतील, असे वाटत होते. मात्र अखेर भारतीय महिलांच्या पदरी निराशा आली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India Women Vs Australia Women Smriti Mandhana heroics goes in vain as India loses the Women tri series final