पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृती-शैफालीच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिलांची विजयी आघाडी

स्मृती मानधना आणि शैफाली वर्मा

India vs West Indies, Women Cricket: भारतीय महिला क्रिकेट संघाने डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात यजमान वेस्ट इंडिज महिलांना ८४ धावांनी पराभूत केले. या विजयासह भारतीय महिलांनी ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 

IPL 2020 : लखनऊसह या नव्या शहरातील मैदानात रंगणार सामने

भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फंलदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकात ४ बाद १८५ धावा केल्या. यजमान वेस्ट इंडिज महिलांना निर्धारित २० षटकात ९ बाद १०१ धावांपर्यंत मजल मारता आली.

कांगारुंना पुन्हा धक्का! आणखी एकाने तणावामुळे घेतली माघार

भारतीय महिला संघाकडून शैफाली वर्माने ४ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ४९ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. तर स्मृती मानधनाने ४६ चेंडूत ६७ धावांची दमदार खेळी केली. या दोघींच्या खेळीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने १३ चेंडूत २१ आणि वेदा कृष्णमूर्ती ७ चेंडूत झटपट १४ धावांची खेळी केली. 
वेस्टइंडिजकडून शॅमेने कॅम्पबेलने सर्वाधिक ३३ धावा केल्या तिच्याशिवाय  हॅली मॅथ्यूजने १३, स्टेसी एन किंगने १३ आणि किशोना नाइटने १२ धावांचे योगदान दिले.  

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india Women tour of West Indies Shafali Verma and Smriti Mandhana shines in India 84 run win over WI in first T20I