विंडीज विरुद्धच्या सलामीच्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने टी-२० सामन्यातीली २२ वे अर्धशतक झळकावले. विंडीजने दिलेल्या २०८ धावांचे आव्हान भारताने सहज परतवून लावले. भारतीय संघाला आता टी-२० मध्ये दोनशे धावाही कमी पडू लागल्यात असेच म्हणावे लागेल. ही गोष्ट खरी असली तरी आजच्या सामन्यात विंडीजनं आणखी चार पाच धावा करायला हव्या होत्या, अशी भावना विराटची फलंदाजी पाहणाऱ्या प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात आली असेल.
INDvsWI T20I : कोहलीने षटकाराने साकारला 'विराट' विजय
भारताच्या डावातील १९ व्या षटकातील चौथ्या विजयासाठी पाच धावांची आवश्यकता असताना विराट षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला. डावातील सहाव्या षटकाराच्या जोरावर तो ९४ धावांवर नाबाद राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाकडे वेगाने पावले टाकणाऱ्या विराट कोहलीने अद्याप टी-२० सामन्यात शतक झळकावलेले नाही. विंडीज विरुद्धच्या सामन्यात त्याने ५० चेंडूत नाबाद ९४ धावा केल्या. जर विंडीजने धावाफलकावर आणखी थोड्या धावा लावल्या असत्या तर कदाचित विराटने हैदराबादच्या मैदानात टी-२० सामन्यातील पहिले वहिले शतक झळकावलेच असते.
INDvsWI T20 : विंडीज विरुद्ध लोकेश राहुलने नोंदवला हा विक्रम
रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४३ तर कसोटी क्रिकेटमध्ये २७ शतकासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७० शतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याच्या भात्यातून चाहत्याने अद्याप एकही शतक पाहिलेले नाही.
A captain's knock by @imVkohli as India win the 1st T20I by 6 wickets. #INDvWI #TeamIndia pic.twitter.com/osg63znNEn
— BCCI (@BCCI) December 6, 2019