भारताच्या दौऱ्यावर असलेल्या पाहुण्या विंडीजने तीन सामन्यांच्या सलामीच्या मालिकेत भारताला टक्कर देण्याचा चांगला प्रयत्न केला. पण कर्णधार विराट कोहली (९४) आणि लोकेश राहुल (६२) धावांच्या जोरावर भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने सामना सहज खिशात घातला असला तरी भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने संघाच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणावर नाराजी व्यक्त केली आहे.
India very poor on the field today ! Young guns reacting a bit late on the ball! Too much cricket ? ? Let’s get these runs come on lads
— yuvraj singh (@YUVSTRONG12) December 6, 2019
...तर विराट भाऊच टी-२० तील पहिले शतक पाहायला मिळाले असते
युवराज सिंगने ट्विटच्या माध्यमातून विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या भारतीय संघाच्या चुका निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलाय. हैदराबादच्या सामन्यात भारतीय संघाकडून खराब कामगिरी पाहायला मिलाले. मैदानात उतरल्यानंतर युवा खेळाडू फार उशीराने फिल्डवर सक्रीय झाल्याचे वाटते. विश्रांतीशिवाय होणाऱ्या सातत्यपूर्ण क्रिकेटचा हा परिणाम आहे का? असा प्रश्नही युवीने उपस्थित केलाय.
INDvsWI T20 : विंडीज विरुद्ध लोकेश राहुलने नोंदवला हा विक्रम
भारतीय संघाच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे विंडीजच्या संघाने निर्धारित २० षटकात २०७ धावांपर्यंत मजल मारली होती. पहिल्या १० षटकात विंडीजने धावफलकावर १०१ धावा केल्या होत्या. धावांची ही सरासरी त्यांनी शेवटच्या षटकापर्यंत कायम ठेवली. या सामन्यात भारतीय संघाने ४ झेल सोडले. तीन गोलदांनी १० पेक्षाही अधिक सरासरीने धावा दिल्या. भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीच्या ५० चेंडूत नाबाद ९४ आणि लोकेश राहुलने ४० चेंडूत केलेल्या ६२ धावांमुळे भारताच्या विजयाचा मार्ग खुला झाला.