पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विंडीज दौऱ्यापूर्वी कोहली पत्रकार परिषद घेणार नाही

विराट कोहली

विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमधील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि उप कर्णधार विराट कोहली यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त पसरले होते. बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावल्यानंतर आता आणखी एक नवा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहित शर्मासोबत मतभेद असल्याच्या चर्चेमुळे विराट कोहलीने विंडीज दौऱ्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधणे टाळल्याचे बोलले जात आहे.

रोहितनं विराटनंतर अनुष्कालाही केलं अनफॉलो!

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ सोमवारी टेक ऑफ करणार आहे. याच दिवशी कर्णधार विराट कोहली एका प्रमोशनमध्ये दिसणार असून त्यानंतर तो विंडीज दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्यामुळे विंडीज दौऱ्यापूर्वी पत्रकार परिषद का बोलावली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

BYJU'S टीम इंडियाची नवी प्रायोजक, बीसीसीआयचा दुजोरा

बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विंडीज दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषद घेणार नाही. आम्ही पत्रकार परिषद घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण ते शक्य झाले नाही. असेही सांगण्यात आले.  भारतीय संघ ३ ऑगस्टपासून विंडीज दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs West Indies Virat Kohli to skip press conference amid rift rumours with Rohit Sharma Report