पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वेस्ट इंडिजला व्हॉईट वॉश, विराट कोहली ठरला सर्वात यशस्वी कर्णधार!

विराट कोहली

दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने यजमान वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देत यश संपादन केले. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर २५७ धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे दोन कसोटी सामन्यांची मालिका भारताने जिंकल्यामुळे भारताला १२० अंक मिळाले असून, विराट कोहली या श्रेणीत पहिल्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री उशीरा २१० धावांवर संपला.

पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोप प्रकरणात शमी विरोधात अटक वॉरंट

वेस्ट इंडिजसमोर दुसऱ्या डावात ४६८ धावा काढण्याचे लक्ष्य होते. पण ते लक्ष्यापर्यंत पोहोचू शकले नाही. पहिल्या दिवसापासून भारताने या कसोटीवर पकड मिळवली होती. ती शेवटपर्यंत कायम ठेवत भारताने विजय संपादन केला. भारतीय संघाने आपला दुसऱा डाव १६८ धावांवर घोषित केला होता. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या नेमक्या गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजची फलंदाजी निष्प्रभ ठरली. त्यामुळे त्यांना लक्ष्यापर्यंत पोहोचणे अशक्य झाले.

दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन, इशांत शर्माने २, जसप्रित बुमराहने १ गडी बाद केला. याआधी भारतीय संघाने एकदिवसीय मालिका आणि टी-२० मध्येही वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे.

पुण्यातील CCTV मुळे नियम मोडणाऱ्या किती जणांना दंड झाला माहितीये?

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs West Indies Virat Kohli surpasses MS Dhoni to reach pinnacle of success in Test cricket