पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराटचा लाडक्या सहकाऱ्यासोबत 'सेल्फी मूड'

विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा फोटो शेअर केला आहे.

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला हैदराबादच्या मैदानातून सुरुवात होणार आहे. ६ डिसेंबरला टी-२० सामन्याने दोन्ही संघातील मालिकेला सुरुवात होईल. टी-२० शिवाय विंडीजचा संघ भारत दौऱ्यावर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ हैदराबादमध्ये दाखल झाला आहे. 

मी 'कव्हर ड्राइव्ह' शिकेन, तापसीनं मिताली राजला दिलं वचन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपला लाडका सहकारी लोकेश राहुल आणि युवा शिवम दुबे यांच्यासोबतचा विमानातील एक फोटो शेअर केला आहे. विराट कोहलीने काढलेल्या सेल्फीला सध्या सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. विराट कोहलीने त्याच्या अधिकृत अकाउंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. 

फेडररची प्रतिमा आणखी उजळली, सन्मानार्थ स्विसच्या नाण्यावर कोरले चित्र

विंडीज विरुद्धचा पहिला सामना हा मुंबईमध्ये नियोजित होता. मात्र ६ डिसेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सामन्यासाठी सुरक्षा पुरवू शकत नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर मुंबईतील सामना हैदराबादमध्ये आणि तिसरा आणि हैदराबादमध्ये नियोजित असलेला अखेरचा टी-२० सामना ११ डिसेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानात रंगणार असून विंडीज विरुद्धचा दुसरा टी-२० सामना तिरुवनंतपुरमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs west indies Virat Kohli Shares Flight Selfie With KL Rahul and Shivam Dube ahead of 1st T20I at hyderabad