पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WIvsIND 3rd ODI : कॅरेबिन बेटावर डौलात फडकला तिरंगा

विराट कोहली

किंग विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर विंडीज विरूद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या विंडीजच्या डावातच पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना प्रत्येकी ३५-३५ षटकांचा खेळवण्यात आला. ख्रिस गेल (७२) आणि लुईस (४३) या सलामी जोडीने केलेल्या शतकी भागीदारीनंतर पूरनच्या झटपट ३० धावांसह कर्णधार होल्डर (१४), ब्रेथवेट (१६) आणि एलन (६) यांच्या अल्प पण महत्वपूर्ण योगदानाच्या जोरावर विंडीजने निर्धारित ३५ षटकात ७ बाद २४० धावा केल्या  होत्या.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय डावाची सुरूवात खराब झाली. संघाच्या धाव फलकावर अवघ्या २५ धावा असताना रोहित शर्माने विकेट फेकली. तो १० धावांवर असताना रोचच्या षटकात एलनने त्याला धावबाद केले. त्यानंतर १३ व्या षटकात एलनने ३६ धावांवर  खेळणाऱ्या धवनची शिकार केली. त्याच्या पाठोपाठ एलनने पंतलाही आल्या पावली माघारी धाडले. 

१२.४ षटकात संघाची अवस्था ३ बाद ९२ अशी असताना कर्णधार विराट कोहलीने युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या साथीनं डाव सावरला. या जोडीने १२० धावांची भागीदारी रचली. ही जोडगोळीच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल, असे वाटत असताना रोचने अय्यरला तंबूचा रस्ता दाखवला. अय्यरने ४१ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. भारताच्या डावातील ३३ व्या षटकात विराच कोहली १४ चौकाराच्या मदतीने ११४(९९) आणि केदार जाधव १ चौकार एका षटकाराच्या मदतीने १६(१२) धावांवर खेळत असताना पावसामुळे पुन्हा खेळ थांबवावा लागला. खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताची धावसंख्या ३२.३ षटकात ४ बाद २५६ अशी होती. उर्वरित षटकांचा खेळ न झाल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला ६ विकेट्सनी विजयी घोषित करण्यात आले.